मुठा नदी पुलावर तीन वाहनांना अपघात; वडगाव बुद्रुक परिसरातील घटना | पुढारी

मुठा नदी पुलावर तीन वाहनांना अपघात; वडगाव बुद्रुक परिसरातील घटना

धायरी, पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक परिसरात ट्रक, टँकर व कार अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. मुठा नदी पुलावर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले.

या अपघाताची माहिती समजताच सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, हवालदार पठाडे, अशोक कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, क्रेन येण्यास उशीर झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला घेण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तब्बल चार तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Back to top button