बारामती : सहकारी बँकांचे 111 कोटी रुपये केंद्राकडे पडून | पुढारी

बारामती : सहकारी बँकांचे 111 कोटी रुपये केंद्राकडे पडून

बारामती, पुणे; पुढारी वृत्तसेवा : सहा वर्षांनंतरही राज्यातील सहकारी बँकांचे केंद्राकडे 111 कोटी पडून असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. राज्यातील विविध सहकारी बँकांच्या जुन्या नोटा अद्यापही केंद्र सरकारने बदलूनच दिल्या नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने नोटबंदीच्या नावाखाली सर्वसामान्य कष्टकरी व शेतकर्‍यांचे जवळपास 111.18 कोटी रुपयांच्या राज्यातील विविध सहकारी बँकांच्या जुन्या नोटा अद्याप बदलून दिल्या नसल्याची माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.

सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. शेतकर्‍यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे, सांगली, नाशिक, अहमदनगर ,कोल्हापूर, नागपूर, वर्धा व अमरावती या जिल्हा बँकांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने राज्यातील विविध सहकारी बँकांच्या जुन्या नोटा अद्यापही बदलून दिल्या नाहीत.

नोटबंदीच्या काळात बँकांनी हे पैसे केंद्र सरकारकडे जमा कले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकर्‍यांच्या जवळपास 111.18 कोटी रुपयांच्या सहकारी बँकांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या नसल्याचे समोर आले आहे. प्रलंबित रकमेबाबत राज्य सरकार केंद्राकडे या अधिवेशनात मागणी करेल का, हा प्रश्न !

Back to top button