पिंपरी : मध्यस्थी करण्यासाठी 50 लाखांची खंडणी | पुढारी

पिंपरी : मध्यस्थी करण्यासाठी 50 लाखांची खंडणी

पिंपरी : बांधकाम साईटवर सुरू असलेला वाद मिटवून देतो, असे सांगून एकाने 50 लाख रुपये आणि 16 हजार 400 चौरस फूट बांधकाम क्षेत्र, अशी खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मार्च 2022 रोजी वाकड येथे घडला. सोमनाथ लाहोट (40, रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विनायक किशोर गारवे (39, रा. नवी सांगवी) यांनी 20 डिसेंबर रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सोमनाथ आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांच्या वाकड येथील ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या वडगाव येथील बांधकाम साईटचा वाद मिटवून देतो, त्याबदल्यात 50 लाख रुपये रोख रक्कम आणि 16 हजार 400 चौरस फूट बांधकाम क्षेत्र द्या, अशी मागणी केली.

Back to top button