नसरापूर : निकालानंतर कासुर्डी गुमा, तेलवडी, वागजवाडी, पारवडी, कुरुंगवडी येथे तणावाचे वातावरण | पुढारी

नसरापूर : निकालानंतर कासुर्डी गुमा, तेलवडी, वागजवाडी, पारवडी, कुरुंगवडी येथे तणावाचे वातावरण

नसरापूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  कमी मताच्या फरकाने निवडून आलेल्या गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कासुर्डी गुमा, तेलवडी, वागजवाडी, पारवडी, कुरुंगवडी येथे तणावाचे वातावरण आहे. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर
एका मताच्या फरकाने  निवडून आलेल्या कासुर्डीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकांच्या निकालामुळेअनेक ठिकाणी ’कही खुशी कही गमचे’ वातावरण आहे. भोर तालुक्यातील कासुर्डी गुमा, वागजवाडी येथे एका मताच्या फरकाने उमेदवार सरपंच म्हणून विजयी झाले. त्यामुळे दोन्ही पॅनेलचे जवळपास समान बल असतानादेखील केवळ एका मताच्या फरकाने सरपंचपद हुकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही गावांत शुकशुकाट झाला आहे. वागजवाडीमध्ये वातावरण निवळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. वादग्रस्त ठिकाणी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगाव, उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांनी भेट दिली.  कासुर्डी गुमामध्ये झालेल्या निवडणुकीत अजय तात्याबा मालुसरे हे 373 एका मताने निवडून आले, तर विरोधक परशुराम यांना 372 मते मिळाली.

एका मताने त्यांचा पराभव झाला तसेच वागजवाडीमध्ये सरपंचपदासाठी पाच महिला रिंगणात होत्या. त्यापैकी निकिता ज्ञानेश्वर आवाळे 226 मते घेऊन या एका मताने विजयी झाल्या आहेत, तर दीपाली ज्ञानेश्वर राऊत यांना 225 मते मिळाली. केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला.  वागजवाडीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत कासुर्डी व तेलवडीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. पारवडी, कुरुंगवडी गावावरदेखील पोलिसांची करडी नजर आहे.

Back to top button