पुणे : खासगी रुग्णालयाचा आगीशी खेळ ; अग्निशमन विभागाचे ’ना हरकत प्रमाणपत्र’च नाही !

पुणे : खासगी रुग्णालयाचा आगीशी खेळ ; अग्निशमन विभागाचे ’ना हरकत प्रमाणपत्र’च नाही !

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : शहरातील तब्बल 130 खासगी रुग्णालये आगीशी खेळत असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. या रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधा असल्या, तरी आग लागल्यास काय करावे असा प्रश्न पडावा, अशीच गत आहे. कारण त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र'च मिळवलेले नाही. महापालिकेकडून या रुग्णालयांना नोटीस बजावल्या जाणार आहेत.

गेल्यावर्षी अहमदनगर, नाशिक, मुंबई अशा विविध भागांमधील रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगींमुळे रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. जानेवारी 2021 मधील भंडारा आगीच्या घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांना अग्निशमन विभागाच्या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. सप्टेंबर 2022 मध्ये अमरावती येथील एका रुग्णालयातही आग लागल्याची नोंद झाली होती. हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या अशा घटना वारंवार घडत असतानाही शहरात अनेक खासगी रुग्णालये अग्निशमन विभागाकडून आवश्यक एनओसी न घेता कार्यरत आहेत.

या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला. महापालिकेकडून वर्षातून दोनदा विभागीय वैद्यकीय अधिका-यांच्या माध्यमातून फायर एनओसी, बायोमेडिकल वेस्ट याबाबत खासगी रुग्णालयांची पाहणी केली जाते. सहा महिन्यांच्या सर्वेक्षणादरम्यान जवळपास 130 खासगी रुग्णालये अग्निशमन विभागाच्या योग्य ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जैववैद्यकीय कचर्‍याची तपासणी करण्यात आलेल्या 540 खासगी रुग्णालयांपैकी 8 रुग्णालये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार कचरा वर्गीकरण करत नाहीत, असेही दिसून आले आहे. खासगी रुग्णालयांची नियमित पाहणी हा राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वांचा महत्त्वाचा भाग आहे. याअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाला खासगी रुग्णालयांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यापूर्वी अनिवार्य आवश्यकतासाठी तपासणी करण्याचे आवाहन केले जाते.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 15 क्षेत्रीय कार्यालयांमधील खासगी रुग्णालयांचे सर्वेक्षण केले. अग्निशमन विभागाकडून एनओसीसाठी तपासणी करण्यात आलेल्या 539 खासगी रुग्णालयांपैकी 130 रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. रुग्णालयांमध्ये बाहेरील रुग्णांचे रजिस्टर आणि रक्त संक्रमण सुविधेचीही तपासणी करण्यात आली. रुग्णालयांनी दर्शनी भागात रुग्णालय नोंदणी प्रमाणपत्र, पीसीपीएनडीटी आणि एमटीपी प्रमाणपत्रे आणि त्यांचे दर लावावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

दर सहा महिन्यांनी खासगी रुग्णालयांची पाहणी केली जाते. त्रुटी आढळून आलेल्या रुग्णालयांना नोटीस किंवा पत्र पाठवले जाणार आहे. ज्या रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे एनओसी नाही किंवा जैववैद्यकीय कचरा विलग करण्यात येत नाही, अशा ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास रुग्णालय जबाबदार असेल. रुग्णालयांनी लवकरात लवकर आवश्यक परवाने घ्यावे.
                         – डॉ. आशिष भारती,  आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका

कोणतीही दुर्घटना घडल्यास  रुग्णालय जबाबदार : पालिका

येरवडा-कळस
13
15
ढोले-पाटील

10
कसबा-विश्रामबागवाडा
55
16
सिंहगड रोड

30
औंध-बाणेर
13
7
बिबवेवाडी
9
4
नगररस्ता-वडगाव शेरी
26
0
भवानी पेठ
22
1
कोंढवा-येवलेवाडी
17
2
हडपसर-मुंढवा
60
4
शिवाजीनगर-घोले रस्ता
42
12
वानवडी-रामटेकडी
30
2
वारजे-कर्वेनगर
31
28
कोथरूड-बावधन
28
14
सहकारनगर-धनकवडी
23
3

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news