पुणे ग्रामपंचायत Live : पालकमंत्र्यांचा करिश्मा चालला नाही ; मावळात राष्ट्रवादीचं वर्चस्व | पुढारी

पुणे ग्रामपंचायत Live : पालकमंत्र्यांचा करिश्मा चालला नाही ; मावळात राष्ट्रवादीचं वर्चस्व

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  मावळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायत पैकी तब्बल ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवून आमदार सुनील शेळके यांनी राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही दणदणीत बाजी मारली.

तालुक्यातील इंदोरी, गोडुंब्रे, देवले, कुणे नामा, वरसोली, सावळा, भोयरे व निगडे या ९ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिरगाव ग्रामपंचायत पूर्ण बिनविरोध झाली होती, तर इंदोरी व देवलेच्या सरपंच पदाव्यतिरिक्त सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींमध्ये फक्त सरपंच पदासाठी लढत झाली.

आज सकाळी तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी वायकर), दीपक राक्षे, श्रीनिवास पांचाळ), सुदाम वाळुंज, अजिंक्य म्हेत्रे, सुनील ताम्हाणे यांनी काम पाहिले. निवडणूक निकालानुसार इंदोरी, देवले, कुणे नामा, वरसोली, सावळा, निगडे व शिरगाव या ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी तर गोडुंब्रे व भोयरे या दोन ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकवला.

ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

१) इंदोरी ग्रामपंचायत
सरपंच : शशिकांत शिंदे (१७७५ विजयी), अंकुश ढोरे (११२५ पराभूत), मधुकर ढोरे (१४१२ पराभूत).
प्रभाग १.बेबीताई बैकर, सपना चव्हाण, प्रभाग २. मुकेश शिंदे, सुरेखा शेवकर, निलिमा काशीद, प्रभाग ३. धनश्री काशीद, दत्तात्रय ढोरे, संदीप ढोरे, प्रभाग ४. लतिका शेवकर, मधुकर शिंदे, संदीप नाटक, प्रभाग ५. स्वप्नील शेवकर, राजश्री राऊत, बाळकृष्ण पानसरे, प्रभाग ६ रेश्मा शिंदे, विनोद भागवत, जयश्री सावंत.(सर्व जागा बिनविरोध)

२) गोडुंब्रे ग्रामपंचायत
सरपंच : निशा गणेश सावंत (३७६ विजयी), कल्पना सावंत (२४९ पराभूत)प्रियंका चोरघे (१३३ पराभूत)
प्रभाग १. प्रियंका आगळे, छाया सावंत(बिनविरोध), किरण येवले (२१५ विजयी),
प्रभाग २ शकुंतला कदम(बिनविरोध), किरण सावंत (१४८ विजयी), प्रभाग ३. सुकन्या चोरघे (११७), गौरव चोरघे (१११).

३) निगडे ग्रामपंचायत
सरपंच : भिकाजी भागवत (६५४ विजयी), संदेश शेलार (६४० पराभूत)
प्रभाग १. मंगल भागवत (१९७), भगवान ठाकर (२२०), संदीप चव्हाण (२०६), प्रभाग २. मनिषा लोटे (२५६), रोशनी साळवे (२६१), चंद्रकांत करपे (२५७), प्रभाग ३. भागाबाई ठाकर (२१५), राजश्री खेंगले (२०५), गणेश भांगरे (२००) व सोमनाथ भांगरे.

४) देवले ग्रामपंचायत
सरपंच : वंदना आंबेकर (५८२ विजयी), सोनाली गिरी (३६१ पराभूत)
प्रभाग १. सोनाली गायकवाड, जयश्री गाडे, विकास दळवी, प्रभाग २. आशा आंबेकर, शंकर आंबेकर, प्रभाग ३. महेंद्र आंबेकर, उर्मिला आंबेकर (सर्व बिनविरोध)

५) वरसोली ग्रामपंचायत
सरपंच : संजय खांडेभरड (७०९ विजयी), बबन खरात (५३९ पराभूत)
प्रभाग १. विजय महाडिक (३८९), मंदा पाटेकर, नारायण कुटे (२६३), प्रभाग २.मीना शिंदे (बिनविरोध), रजनी कुटे (४३१), अरविंद बालगुडे (३०३), प्रभाग ३. सीता ठोंबरे व राहुल सुतार (बिनविरोध), नलिनी खांडेभरड (२२२)

६) कुणे नामा ग्रामपंचायत
सरपंच : सुरेखा उंबरे (५०६ विजयी), नलिनी उघडे (२८४ पराभूत), रेश्मा जाधव (१६९ पराभूत)
प्रभाग १.सागर उंबरे (१३९), आरती पिंगळे (१४९), बेबी खांडेभरड (१३७), प्रभाग २. सुरेश होले (१८०), कलावती उघडे(बिनविरोध), अशोक गोजे (१८१), प्रभाग ३. कमल वाघमारे (१९१), आश्विनी वाघमारे (१४१), संजय ढाकोळ (१६८)

७) सावळा ग्रामपंचायत
सरपंच : मंगल ढोंगे (४५४ विजयी) मनीषा आढारी (२८८ पराभूत)
प्रभाग १. प्रियंका गोंटे(बिनविरोध), जानकु वडेकर (१७७), चिमाबाई ताते(१६८), प्रभाग २. सचिन तळपे(बिनविरोध), प्रभाग ३. अनिता हिलम(बिनविरोध) जालिंदर भोईर (११०)

८) भोयरे ग्रामपंचायत
सरपंच : वर्षा भोईरकर (४८९ विजयी), सुरेखा भोईरकर (३८१ पराभूत),
प्रभाग १. दीपाली जांभुळकर(बिनविरोध), ऋषिकेश खुरसुले (२६२), बाळू भोईरकर (२४६), प्रभाग २. संगिता वाघमारे (११२), नीता भोईरकर (११७), प्रभाग ३. रंजना भोईरकर, रामदास भोईरकर (१९१)

९)शिरगाव ग्रामपंचायत
सरपंच : प्रवीण गोपाळे(बिनविरोध)
प्रभाग १. योगिता वाघमारे, पूजा गोपाळे, श्रीधर गोपाळे, प्रभाग २. संध्या गायकवाड, वैशाली गोपाळे, समीर अरगडे, रोहिणी गोपाळे, स्वप्नील अरगडे, अक्षय गोपाळे (सर्व बिनविरोध)

पालकमंत्री येऊनही भाजपला धक्का !

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील निवडणूक सुरू असलेल्या निगडे व भोयरे या दोन गावांना भेट दिली होती. यापैकी निगडे ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी ने झेंडा फडकवला असून एकूण ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले अवघ्या दोन ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊनही मावळात भाजपला धक्का बसला आहे.

 

विरोधीपक्षनेते अजित पवार व आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक आम्ही लढवली असून आमदार शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेने या विजयाच्या रूपाने राष्ट्रवादीला कौल दिला आहे.

गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Back to top button