पुणे : विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा येत्या 15 दिवसांत | पुढारी

पुणे : विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा येत्या 15 दिवसांत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या 15 दिवसांत घेण्यात येणार आहे. त्यासाठीची बैठक मंगळवारी होणार आहे. यामध्ये सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. विद्यापीठातर्फे वर्षातून एकदाच पदवी प्रदान समारंभ होत होता.

मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून फेब—ुवारी-मार्च आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पदवी प्रदान समारंभ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर प्रमाणपत्र मिळत होते. मात्र, तब्बल दोन महिने पदवी प्रमाणपत्र समारंभ न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

विद्यार्थी विद्यापीठाकडे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. त्यानुसार विद्यार्थ्यांना पोस्टाने घरपोच अथवा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. या समारंभासाठी दर वर्षी मान्यवरांना बोलवले जाते. यंदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पदवी प्रदान सोहळ्यासाठी आमंत्रित करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु, त्यांची वेळ न मिळाल्यामुळे आता नवीन पाहुणे निश्चित करण्यात येतील आणि येत्या 15 दिवसांत छोटेखानी पदवी प्रदान सोहळा घेण्यात येणार आहे. तर, फेब—ुवारी महिन्यात नियमित पदवी प्रदान
सोहळा होईल.

Back to top button