पुणे : कोरोना पळाला तशी ’बूस्टर’कडे पाठ; नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद | पुढारी

पुणे : कोरोना पळाला तशी ’बूस्टर’कडे पाठ; नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असल्याने लसीकरणाबाबतचे गांभीर्यही कमी झाले आहे. त्यातही बूस्टर डोसला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. महापालिका हद्दीत 1 ते 17 डिसेंबर या कालावधीत केवळ साडेसहाशे जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 15 ऑगस्टपासून पुढील 75 दिवस 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लशींचे बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली.

नागरिकांच्या प्रतिसादाअभावी खासगी रुग्णालयांमधील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शासकीय लसीकरण केंद्रांमधील लसीकरणालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. मागील महिन्यात कोव्हिशिल्ड लशीच्या उर्वरित साठ्याची मुदत संपत आल्याने 3-4 दिवसांसाठी कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. सध्या कोव्हॅक्सिन लशीचा बूस्टर डोस दिला
जात आहे.

18 ते 60 वर्षे वयोगटातील बूस्टर लसीकरण
दिनांक               लसीकरण
1 डिसेंबर               94
2 डिसेंबर             157
3 डिसेंबर            159
4 डिसेंबर              14
4 डिसेंबर             39
5 डिसेंबर             24
6 डिसेंबर             21
7 डिसेंबर            18
8 डिसेंबर            18
9 डिसेंबर            46
10 डिसेंबर          10
11 डिसेंबर           32
12 डिसेंबर           33
13 डिसेंबर           28
14 डिसेंबर          20
15 डिसेंबर          23
16 डिसेंबर         44
17 डिसेंबर         12

Back to top button