खडकवासला : मस्तवाल गव्याच्या हल्ल्यात बैल ठार; जनावराचा मृत्यू होण्याची पहिली घटना | पुढारी

खडकवासला : मस्तवाल गव्याच्या हल्ल्यात बैल ठार; जनावराचा मृत्यू होण्याची पहिली घटना

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) हद्दीलगत खडकवासला धरणभागात एका मस्तवाल रानगव्याने धुमाकूळ घातला आहे. धरणाच्या तीरावरील कुडजे येथे रानात चरत असलेल्या बैलावर हल्ला केला. त्यात बैल जागीच ठार झाला. रानगव्याच्या हल्ल्यात जनावर ठार होण्याची ही वन खात्याच्या इतिहासात पहिलीच घटना आहे. त्यामुळे वनविभाग अचंबित झाले आहे.
हा प्रकार काल रविवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळी सुदैवाने शेतकरी शरद एकनाथ पायगुडे हे गोठ्यात होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या चार-पाच दिवसांपासून एका मस्तवाल रानगव्याचा कुडजे-अहिरे परिसरात धुमाकूळ सुरू आहे. ज्वारी, भाजीपाला अशा पिकांचे रातोरात नासाडी करीत आहे.

बैलाने म्हटले ‘आ मुझे मार’
हल्ल्यात ठार झालेला बैल तीन ते चार वर्षे वयाचा आहे. बैल, म्हैस समजून रानगव्याच्या मागे फिरत होता. आदल्या दिवशीही रानगवा कुडजे परिसरात आला होता. काल सायंकाळी बैल रानगव्याच्या मागे पळत आला. त्यामुळे चिडून रानगव्याने बैलावर जोरदार हल्ला केला, त्यात बैल जागीच ठार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.बैलाने म्हटले ‘आ मुझे मार’
हल्ल्यात ठार झालेला बैल तीन ते चार वर्षे वयाचा आहे. बैल, म्हैस समजून रानगव्याच्या मागे फिरत होता. आदल्या दिवशीही रानगवा कुडजे परिसरात आला होता. काल सायंकाळी बैल रानगव्याच्या मागे पळत आला. त्यामुळे चिडून रानगव्याने बैलावर जोरदार हल्ला केला, त्यात बैल जागीच ठार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

काल दुपारी शरद पायगुडे, मारुती मारणे हे कुडजे येथील श्री काळूबाई मंदिराजवळील आपल्या शेतात ज्वारी पिकांची राखण करीत होते. त्या वेळी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एनडीएच्या हद्दीतून भलामोठा रानगवा शेतात शिरला. त्यामुळे पायगुडे व इतर शेतकर्‍यांनी जोरदार आरडाओरडा करीत रानगव्याला पिटाळून लावले. त्या वेळी एक बैल रानगव्याच्या पाठीमागे धावत गेला.

रानगव्याच्या मागोमाग बैल तेथून दूर अंतरावर एका शेतात गेला. तेथे मागे फिरून चिडलेल्या मस्तवाल रानगव्याने बैलावर जोरदार हल्ला केला. बैलाच्या शिंगावर, तोंडावर जोरदार धडका मारल्या. त्यात शिंगे, कानातून रक्तस्राव होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी शरद पायगुडे यांनी चरण्यासाठी रानात सोडलेली म्हैस, एक बैल परत आले.

मात्र, एक बैल परत आला नाही. त्यामुळे त्यांनी रानात धाव घेतली असता बैल ठार झालेला दिसला. रात्री उशिरा पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन खात्याला माहिती दिल्यानंतर सोमवारी (दि.19) दुपारी खडकवासला वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक सुनीता सुभेदार या पथकासह दाखल झाल्या.

रानगव्याने जनावर ठार मारण्याचा हा वनविभागाच्या इतिहासात पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

                                                           – वैशाली हाडवळे,
                                  वनपरिमंडल अधिकारी,खडकवासला वनविभाग

पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, घटनास्थळी जाऊन मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला आहे. शासननिर्णयानुसार शेतकरी शरद पायगुडे यांना भरपाई देण्यात येणार आहे.

Back to top button