पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर! नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी | पुढारी

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर! नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी

पुणे : शहरात महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातील विध्यार्थी MPSC चा अभ्यास करण्यासाठी येत असतात. वारंवार त्यांच्या मागण्यांसाठी ते आंदोलन करताना दिसतात. आज पुन्हा एकदा नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर विद्यार्थी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरले आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून राबवावा, या मागणीसाठी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील शाश्त्री रस्त्यावर आंदोलन करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. “वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी”,अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

या आहेत विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या?

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ही 4 जून रोजी आहे. त्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5-6 महिने अभ्यास गरजेचा आहे.
  • Syllabus जसाच्या तसा UPSC चा Copy Paste आहे. MPSC च्या मुलांना अजून संदर्भ साहित्यच उपलब्ध नाही.
  • जुन्या 5000 मुलाखती रखडल्या आहेत .राज्यसेवा 2022 ची तर मुख्यही झालेली नाही, त्यांच्या मुलाखती व्हायला एप्रिल- मे महिना यायचा मग त्यांनी अभ्यास कधी आणि कशातून करायचा.
  • देश आणि राज्यपातळीवरील प्रशासकीय गरजांमध्ये फरक असतो, त्यामुळे केंद्राच्या परीक्षेचा अभ्यास राज्यसेवेसाठी जसाच्या तसा योग्य आहे का. राज्याचा इतिहास-भूगोल-सांस्कृतिक-राजकीय वैशिष्ट्यांनुसार काही बदल गरजेचे
  • नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या 2 संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते 2025 साठी तयारी करतील परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे.

Back to top button