कडूस : गारगोटवाडीसाठी 93 टक्के मतदान

कडूस : गारगोटवाडीसाठी 93 टक्के मतदान

कडूस; पुढारी वृत्तसेवा : गारगोटवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 93.04 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रविवारी (दि. 18) सकाळी सात वाजता शांततेत मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत होता. मतदारांनीही आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्याचे चित्र होते. ग्रामपंचायतच्या एकूण 1 हजार 123 मतदारांपैकी 1 हजार 49 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 517 पुरुष तर 532 महिलांचा समावेश आहे.

गारगोटवाडी ग्रामपंचायतची दुसर्‍यांदा लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक होत असून विद्यमान सरपंच वर्षा बच्चे तर सोनाली गारगोटे या नशिब अजमावत आहे. मतमोजणीनंतर गावचा सरपंच कोण हे चित्र स्पष्ट होणार आहे. सदस्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार आपले भवितव्य आजमावत असून मतदान प्रक्रियेनंतर त्यांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त झाले.

निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार व मंडल अधिकारी सारिका विटे, तलाठी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता पोलिसांचे विशेष पथक मतदानस्थळी तैनात करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news