भांडगाव चौकातील बेशिस्त पार्किंग कोण हटवणार ? | पुढारी

भांडगाव चौकातील बेशिस्त पार्किंग कोण हटवणार ?

खोर (ता. दाैंड); पुढारी वृत्तसेवा : भांडगाव चौकातील बेशिस्त पद्धतीने चारचाकी गाड्या लावण्याचा प्रकार सुरूच आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही तो संपत नसल्याने हे बेशिस्त पार्किंग हटविण्याची जबाबदारी नक्की कोणाची? यवत पोलिस प्रशासनाची की महामार्ग टोल प्रशासन विभागाची, असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत.

चौकातील बेशिस्त पार्किंग ही मोठी समस्या बनली असून, पोलिस व टोल या दोन्ही प्रशासनांच्या चालढकलीमुळे जनता वेठीस धरली जात आहे. अनेकदा याबाबतीत वृत्त प्रसिद्ध करूनही महामार्गालगतचे बेशिस्त पार्किंग न हटता उलट दिवसेंदिवस वाढ होत आहे. भांडगाव ग्रामपंचायतनेही लक्ष देणे गरजेचे बनले असून, दोन्ही विभाग बघ्याची भूमिका बजावत असतील, तर आता गावालाच हस्तक्षेप करावा लागणार आहे. महामार्ग पाटस टोल प्रशासन विभागही बेशिस्त पार्किंगला तितकेच जबाबदार असूनही प्रकरणाकडे उघडपणे डोळेझाक होत आहे.

 

Back to top button