पुणे : घनकचरा व्यवस्थापनाची कामे असमाधानकारक; जि.प.ने मागविला अहवाल | पुढारी

पुणे : घनकचरा व्यवस्थापनाची कामे असमाधानकारक; जि.प.ने मागविला अहवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यांमधील गावांमध्ये कचर्‍याचा प्रश्न बिकट असताना घनकचरा व्यवस्थापनेची कामांची गती वाढत नाही. कामासाठी तालुकास्तरावर निधी उपलब्ध करून दिला, ग्रामपंचायतींकडे पंधराव्या वित्त आयोगाचा देखील निधी होता. मात्र, कामे असमाधानकारक असल्याची खंत व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतींचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांकडे डिसेंबर अखेरपर्यंत मागवला आहे.

सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेकडून त्यांनी केलेल्या कामांची यादी, प्रत्यक्षात काम झाल्याची टक्केवारी लेखी स्वरूपात देऊन पुढील नियोजनाचा अहवाल डिसेंबर अखेर पर्यंत देण्यास सांगितले आहे. प्रत्येक तालुक्याला 2021-22 मध्ये घनकचरा प्रकल्पाची अंदाजपत्रके तयार करून तांत्रिक मान्यता देण्यात आल्या होत्या.

राज्यात गुणांकन मिळाले कमी…
वीस महिन्यांचा कालावधी देऊनही जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. परिणामी कामे रेंगाळली आहेत. या कामाची असमाधानकारक स्थितीमुळे राज्यातील गुणांकनामध्ये जिल्हा मागे पडले आहे.

Back to top button