पुणे : मेट्रोचे काम राहणार दोन दिवस बंद | पुढारी

पुणे : मेट्रोचे काम राहणार दोन दिवस बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी- 20 परिषदेच्या कालावधीत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन ते तीन दिवस मेट्रोचे काम बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मेट्रो प्रशासनच घेणार आहे, यासाठी मेट्रो अधिकार्‍यांसोबत लवकरच चर्चा केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

जी-20 परिषदेच्या तीन बैठका जानेवारी ते जून दरम्यान पुण्यात होणार आहेत. या बैठकीसाठी 36 देशांचे 150 ते 200 प्रतिनिधी येणार आहेत. 16 आणि 17 जानेवारी रोजी परिषदेचे सदस्य शहरात येणार आहेत. या अनुषंगाने पाहुण्यांच्या दौर्‍यातील रस्त्यांची दुरुस्ती, चौकांचे सुशोभीकरण, पथदिव्यांची दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. विक्रम कुमार म्हणाले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, पारंपरिक नृत्य आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

Back to top button