भोर : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करा; शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी ढगे यांचे आवाहन | पुढारी

भोर : शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करा; शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी ढगे यांचे आवाहन

भोर; पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत शेततळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने अनुदानाची रक्कम वाढवून 75 हजार रुपये केली आहे. शेतकर्‍यांनी या योजनेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले आहे.

ज्या शेतकर्‍यांना शेततळ्यासाठी योग्य जागा असतील त्या शेततळ्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 33, तर 6 अनुसूचित जाती जमातीतील शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. याकरिता ारहरवलीांरहरळीं. र्सेीं. ळप या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. त्यामध्ये सिंचन साधने व सुविधा या घटकाखाली वैयक्तिक शेततळे हे निवडावे. त्यानंतर इनलेट आऊटलेटसह अथवा इनलेट आऊटलेटविरहित हा पर्याय निवडून आकारमान व स्लोप निवडावा.

महाडीबीटी पोर्टलवर सोडतद्वारे लाभार्थींची निवड करण्यात येईल. शेतकर्‍यांच्या नावे 60 गुंठे क्षेत्र असणे अनिवार्य असून, शेततळ्यासाठी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. तसेच यापूर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे, अशा विविध योजनेतून लाभ घेतलेला नसावा, असेही ढगे यांनी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवर शेततळे अस्तरीकरण, कृषी यांत्रिकीकरण, ठिबक/तुषार संच, कांदा चाळ, शेडनेट/पॉलिहाऊस व इतर योजनांचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Back to top button