पुणे : रेल्वेची पार्सल सेवा आता ऑनलाईनही | पुढारी

पुणे : रेल्वेची पार्सल सेवा आता ऑनलाईनही

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेनं आपलं पार्सल पाठवायचं आता अतिशय सोपं झालं आहे. कारण रेल्वेची पार्सलसेवा आता ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांची रेल्वेनं पार्सल पाठवण्यासाठी रेल्वेस्टेशनवर जा, तिथे रांगेत थांबा आणि आपलं पार्सल बुकिंग करा या सर्व कटकटीतून मुक्तता झाली आहे. रेल्वेच्या पुणे विभागातून दिवसाला 200 ते 220 गाड्यांची ये-जा असते. त्यामार्फत 70 ते 80 हजार प्रवासी नॉन-पिक सिझनमध्ये प्रवास करतात.

तर पिक सीझनमध्ये प्रवाशांची संख्या एक ते दीड लाखांच्या घरात जाते. रेल्वेच्या प्रत्येक गाडीला दोन राखीव डबे हे पार्सल सेवेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्या डब्यांमधून फळे, पाले-भाज्या, खाद्यपदार्थ, मासे, पोल्ट्री वस्तु, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स मशिन, फर्निचर, कार, दुचाकी यांसारख्या विविध प्रकारचे पार्सल देशभरात पाठवण्यात येतात. पुण्यातून दिवसाला सरासरी 52 ते 60 दुचाकी पाठविल्या जातात.

…असे करा पार्सलचे ऑनलाईन बुकिंग
या संकेतस्थळाला भेट द्या- www. parcel. indianrail. gov. in/ पोर्टलवर लॉगीन करावे.
पार्सल पाठविण्याचे आणि स्विकारण्याचे ठिकाण ऑनलाईन अर्जात नमूद करावे.
या अर्जात गाडीचे नाव आणि क्रमांकाची योग्य निवड करावी, आणि अर्ज भरावा
पार्सलसाठी लागणारा खर्च यावेळी नमूद केला जाईल.
अर्जाची प्रत दाखवून पाठविण्याचे पार्सल स्टेशनवर द्यावे.
वजन करून त्याप्रमाणे शुल्क बुकींग काऊंटरवर भरून पावती घ्यावी.
संबंधित ठिकाणी पार्सल पोहचल्यावर एसएमएस प्राप्त होईल.
मुळ पावती दाखवून स्टेशनच्या डिलीव्हरी काऊंटरवरून पार्सल ताब्यात घ्यावे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या महिन्यातील पार्सल वाहतूक…
पाकिटे, वस्तु – 10 लाख 40 हजार 239
वजन – 35 हजार 927 टन
उत्पन्न – 20 कोटी 90 लाख…

रेल्वे पार्सल टोल फ्री क्रमांक

रेल्वे पार्सल पाठविण्यासाठी किंवा पाठविल्यावर काही समस्या आल्यास प्रवाशांनी पार्सल विभागातील 9699746060 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Back to top button