पुणेः सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेची केली फसवणूक | पुढारी

पुणेः सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेची केली फसवणूक

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  एका महिला डॉक्टरने सहलीसाठी गुगलवर टेम्पो ट्रॅव्हल बसचा शोध घेणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्याने बस भाड्याने देण्याचा बहाणा करत त्यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये परस्पर वर्ग करुन घेतले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी 49 वर्षीय महिला डॉक्टर असून, हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांना मैत्रिणींसोबत सहलीला जायचे होते. यासाठी त्यांनी गुगलवर टेम्पो ट्रॅव्हलसर बसचा शोध घेतला. यानंतर त्यांना महाराजा ट्रॅव्हलमधून बोलत असल्याचे सांगत एकाचा फोन आला. त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. फिर्यादीने लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये परस्पर काढून घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे करत आहेत.

महिला व्यापार्‍याची फसवणूक

खोटी फर्म स्थापून एका महिला व्यापार्‍याकडून 3 लाख 79 हजारांचे तुप आणि गुळ खरेदी करुन दोघांनी पळ काढला. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण वसंत तन्ना आणि हितेश असवानी (रा. दोघे पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची भावासह भागीदारीत महालक्ष्मी ट्रेडींग नावाने कंपनी आहे. याचे कार्यालय महर्षीनगर येथे आहे. त्यांनी राजकोट येथील एका कंपनीची देशी घी आणि इतर उत्पादनांची डिलरशीप घेतली आहे. याचा माल ते घाऊक दरात व्यापार्‍यांना विकतात. त्यांना कंपनीच्या सेल्स मॅनेजरने भुषण आणि हितेश यांना देशी घी आणि गुळ विकत घ्यायचा असल्याची माहिती दिली.

Back to top button