पिंपरी : धमकी देऊन महिलेचा विनयभंग | पुढारी

पिंपरी : धमकी देऊन महिलेचा विनयभंग

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा, धमकी देत महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 7 डिसेंबर 2022 रोजी दि सेवा विकास बँक, पिंपरी येथे उघडकीस आली. मनोज लक्ष्मणदास बक्षाणी (54, रा. साईचौक, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 11) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सेवा विकास बँकेत काम करीत होत्या. त्या वेळी आरोपीने केबिनमध्ये बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन केले. श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्याप्रमाणे काम करा, नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी आरोपीने दिली.
तसेच, जेवणासाठी बाहेर येण्याची जबरदस्ती करून आरोपीने फिर्यादीस कामावरून काढून टाकण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button