पिंपरी : खंडणी मागितल्याने नऊ जणांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : खंडणी मागितल्याने नऊ जणांवर गुन्हा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : एक कोटी 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला. रणजीत कुमार गुप्ता (44, रा. नाना पेठ पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिला, अनुराग जैन, सौरभ हेमराज बोरा, भारद्वाज, कृष्ण कुमार, गोलू शर्मा आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील पाच मजली इमारतीचे 40 फ्लॅट करारनामा करून घेतले. दरम्यान, त्याचे ठरल्याप्रमाणे पैसे न देता फिर्यादींची फसवणूक केली. तसेच, डिपॉझिटचे 55 लाख रुपये फिर्यादी परत देत असताना आरोपींनी त्यांच्याकडे एक कोटी 35 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच, तक्रार मागे घेण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button