पुणे : 'प्रशासनाने बाईक टॅक्सी बंद न करता मला फसवलं !' असे म्हणत रिक्षा चालकांनी घेतली आक्रमक भूमिका | पुढारी

पुणे : 'प्रशासनाने बाईक टॅक्सी बंद न करता मला फसवलं !' असे म्हणत रिक्षा चालकांनी घेतली आक्रमक भूमिका

पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क : 

शहरातील बेकायदा बाईक, टॅक्सीच्या वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षा चालकांनी आज चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन आजपासून (दि. 12) रिक्षाचालकांकडून करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात 28 तारखेला रिक्षाचालकांनी चक्काजाम आंदोलन केले होते. त्या वेळी पालकमंत्र्यांनी बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु, 12 डिसेंबरपर्यंत बाईक टॅक्सी बंद केल्या नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार, असा इशारा रिक्षाचालकांनी दिला होता. त्यामुळे बाईक, टॅक्सी बंद न झाल्याने आजपासून बाईक टॅक्सी बंद होईपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे, असे बाईक टॅक्सीविरोधी समितीकडून सांगण्यात आले. या आंदोलनाची परिणीती मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. रिक्षाचालकांनी आरटीओ ऑफिससमोर जमत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

रिक्षाचालकांनी संगम ब्रिज, सीओईपीच्या कॉलेजच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर चक्काजाम केला आहे. याशिवाय पुणे रेल्वे स्टेशनला जाणारा शाहीर अमर शेख चौकातील रस्ता रिक्षाचालकांनी अडवला आहे. ‘प्रशासनाने बाईक टॅक्सी बंद न करता मला फसवलं !’  असे म्हणत रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत हा चक्काजाम केला आहे. त्यामुळे ऐन संध्याकाळच्या पीक ट्रॅफिक अवर्सच्या वेळी रस्ते जाम होण्याची शक्यता आहे.

अॅप विरोधात गुन्हा दाखल : 

रिक्षाचालकांना बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या अॅप विरोधात  गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. पण त्यावर अंमलबजावणी न झाल्याने रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत.

जाम असलेली ठिकाणं : 

– शाहीर अमर शेख चौकात रस्ता अडवला
– संगम ब्रिज फुलावर रिक्षा आडव्या घालून रस्ता अडवला
– पॅसेंजर घेऊन जाणाऱ्या
– इतर रिक्षा चालकांची वाद घालून प्रवाशांना उतरवले
– संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालय परिसरातून पांगून शाहीर अमर शेख चौक, संचेती परिसर, रुबी हॉलकडे जाणारा रस्त्यावर आणि आरटीओचे चौकात धिंगाणा घातला

Back to top button