पिंपरी : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये तरुणाची फसवणूक | पुढारी

पिंपरी : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये तरुणाची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून तरुणाची 71 हजार 237 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी (दि. 8) सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत हिंजवडी फेज एक येथे घडला. के. सुरेश काट्टामंची (28, रा. हिंजवडी. मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वॅग मल्होत्रा नावाच्या ट्रेडर इन्व्हेस्टरला सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर संबंधित महिलेने फिर्यादींसोबत चॅटिंग करून सुरुवातीला 750 रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच टप्प्यात 71 हजार 237 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. कुठलाही नफा न देता वेगवेगळ्या कारणांनी पैसे घेतले जात असल्याने फिर्यादींनी अधिक गुंतवणूक करण्यास नकार दिला. आरोपीने फिर्यादींना गुंतवणूक केलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button