पौड : तैलबैल सुळक्यावरून पडून एकाचा मृत्यू | पुढारी

पौड : तैलबैल सुळक्यावरून पडून एकाचा मृत्यू

पौड; पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील तैलबैल येथील सुळक्यावर आरोहण करताना दोर तुटल्याने 200 फूट खाली पडून एका ट्रेकर युवकाचा मृत्यू झाला. रविवारी (दि.11) सकाळी ही घटना घडली. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यूच्या शिलेदारांनी युवकाचा मृतदेह बाहेर काढला. सोमनाथ बळीराम शिंदे (वय 25, रा. कात्रज, पुणे. मूळ गाव शिंदफळ, जि. उस्मानाबाद.) असे मृत युवकाचे नाव आहे. सोमनाथ व इतर काही जणांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता.

रात्री गावात मुक्काम केल्यानंतर रविवारी पहाटे 5.30 वाजता त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. सकाळी नऊच्या दरम्यान सोमनाथ खाली पडला. यामध्ये गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताची ही माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे राजेंद्र कडू, महेश मसने, सुनील गायकवाड, सूरज वरे, योगेश उंबरे, प्रणय अंबुरे, रतन सिंग, आदित्य पिलाने, हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ आदींनी घटनास्थळी धाव घेत शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, बीट अंमलदार शिंदे यांनीही पाहणी केली.

 

Back to top button