रांजणगाव गणपती : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार | पुढारी

रांजणगाव गणपती : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार

रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरातील सभागृहात शिरूर तालुक्याच्या आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या 39 गावांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संघटक राहुल गोरे, महिला आघाडी संर्पकप्रमुख जयश्री पलांडे, श्रद्धा कदम, जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदीप शिंदे, तालुकाप्रमुख गणेश जामदार, तालुकाप्रमुख पोपट शेलार, कैलास भोसले, सुधीर फराटे, समाधान डोके, दादा खर्डे, शहाजी नळकांडे, विशाल सोनवणे, विशाल फलके, किरण देशमुख, तालुका समन्वयक सुमन वाळुंज, स्वाती बोरकर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोजगार हिरावण्याचे काम केले गेले. तसेच कर्नाटकच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीमावाद सुरू केला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अगोदरच उद्योग आले असताना आम्ही आणल्याच्या वल्गना विद्यमान सरकार करत आहे. राष्ट्रवादीकडून त्रास होतो म्हणणारांचे नेते वळसे पाटलांच्या घरी जेवायला गेले, हे कसे सहन झाले. पूरस्थितीचा दौरा चालू असताना शेतकर्‍यांचे कैवारी फिरकलेच नाहीत. मनसेचे अविनाश घोगरे, भाजपाचे उमेश पाचुंदकर, दिगंबर खेडकर, विजय गलांडे यांनी या वेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सूत्रसंचालन रोहिदास खेडकर यांनी केले.

Back to top button