पिंपरी : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : बंदोबस्तात हलगर्जी केल्यामुळे १० पोलिसांचे निलंबन | पुढारी

पिंपरी : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : बंदोबस्तात हलगर्जी केल्यामुळे १० पोलिसांचे निलंबन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलीस दलातील १० जणांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, पोलीस कर्मचारी प्रियांका गुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी चिंचवडगाव येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी ते गेले होते. दरम्यान, तिघांनी मिळून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Back to top button