पुणे : उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा | पुढारी

पुणे : उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरातून तामिळनाडूकडे आलेल्या चक्रीवादळाचा वेग मंदावला असून ते भारतीय किनारपट्टीजवळ आले आहे. दरम्यान, याचा महाराष्ट्रावर प्रभाव दिसणार असून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंदौस चक्रीवादळ शुक्रवारी तामिळनाडू किनारपट्टीच्या 270 कि.मी. जवळ आले आहे. मात्र त्याचा वेग 100 कि.मी.वरून 75 कि.मी.वर आला आहे. या वादळाचा प्रभाव 15 डिसेंबरपर्यंत भारतीय किनारपट्टीवर राहणार आहे. या भागात जोरदार पाऊस सुरू असून तेथून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

Back to top button