राजुरी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

राजुरी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील राजुरी लळईमळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या शुक्रवारी (दि. 9) पहाटे पिंजर्‍यात अडकला. दरम्यान सन 2022 या वर्षातील परिसरातील पकडलेला चौथा बिबट्या असून त्याला माणिकडोह बिबट निवारा प्रकल्पात सोडण्यात आल्याचे वनरक्षक संतोष साळुंखे यांनी सांगितले.

राजुरी (लळईमळा) परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता लळईमळ्यातून गावात मोटारसायकलवर जात असलेल्या तरुण जोडप्याला बिबट्या आडवा गेल्याची घटना ताजी असतानाच त्याच रात्री उशिरापर्यंत बिबट्याने परिसरात गस्त घातली होती. रात्री भीतीमुळे ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे बंद केले होते. गुरुवारी परिसरातील शेतकर्‍यांनी बिबट्याच्या व्यथा मांडल्यानंतर वनरक्षक संतोष साळुंखे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लळईमळा येथील किरण सावकार हाडवळे यांच्या शिवारात पिजरा लावला. त्यात शुक्रवारी पहाटे एक नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news