पिंपरी : तळेगावात ई-व्हेईकलचे 4 चार्जिंग स्टेशननगर परिषदेमार्फत शहरात सुविधा

पिंपरी : तळेगावात ई-व्हेईकलचे 4 चार्जिंग स्टेशननगर परिषदेमार्फत शहरात सुविधा
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरात चार ठिकाणी ई-व्हेईकलचे चार्जिंग स्टेशन सुरू केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी ई-व्हेईकलचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पत्रकाव्दारे प्रसिद्धीस दिले. 'माझी वसुंधरा' अभियान 3.0 सुरू झाले असून या अंतर्गत पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या निसर्गाशी संबंधित पाच तत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण शाश्वत विकास करू शकणार नाही. सद्यस्थितीत हीच वेळ निसर्गास साथ देण्याची आहे. त्यासाठी निसर्गाशी संबंधित या पाच तत्त्वावर आधारित 'माझी वसुंधरा' अभियान हे आपल्या शहरामध्ये राबविण्यात येत आहे.

यामध्ये घनकचरा व्यवस्थापन करणे, ओला कचरा , सुका कचरा वर्गीकरण करणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतचा वापर करणे, सौर उर्जा साधने, इलेक्ट्रिक वाहन वापरणे, प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी वापरणे, वृक्षारोपण करणे, वृक्षसंवर्धन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंगसाठी नगर परिषदेने शहरात चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. ही चार्जिंग स्टेशन्स 1) मारुती मंदिर चौक येथील नगर परिषद कार्यालय, 2) सरदार अजितसिंहराजे व्यापारी संकुल "बी" विंग इमारतीचे पार्किंग, 3) तळेगाव रेल्वे स्टेशन बाहेरील नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेरील बाजूस आणि 4) तळेगाव स्टेशन भागातील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र. 3 च्या आवारात अशी चार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

तळेगावकर नागरिकांच्या सहकार्याने व सहभागाने आपले तळेगाव दाभाडे शहर प्रदूषणमुक्त ठेवता येणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

शहरात 20 हजाराच्या वर वाहने
तळेगाव दाभाडे शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या 20868 आहे. यामध्ये 18991 दुचाकी, 1407 चार चाकी कार्स, 11 सार्वजनिक वाहतूक बसेस, 390 तीनचाकी वाहने, 8 मालवाहतूक वाहने व 61 मोटर कॅब्स, अशी एकूण 20868 इलेक्ट्रिक वाहनांची नोंद असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news