

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.7) अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षात निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले. तालुक्यातील 26 पैकी एकही ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध झाली नाही. मात्र सदस्यपदाच्या 33 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 71 उमेदवार तर 213 जागांसाठी 472 उमेदवार निवडणूक लढवीत आहे.
बिनविरोध सदस्य झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये अजोती- सुगाव 3 जागा, माळवाडी 7 जागा, पिंपरी खुर्द- शिरसोडी 2 जागा, बिजवडी 2 जागा, झगडेवाडी 3 जागा, थोरातवाडी 1 जागा, रणमोडवाडी 2 जागा, कुरवली 2 जागा, म्हसोबाची वाडी 8 जागा, मदनवाडी 2 जागा, डिकसळ 1 जागा अशा एकूण 33 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
गाव, सरपंचपदासाठी उमेदवार संख्या, सदस्य जागा, उमेदवार संख्या: पडस्थळ – (2-7-13), हिंगणगाव- (3-9-18), अजोती-सुगाव- (2-4-8), माळवाडी – (5-4-8), पिंपरी खुर्द- शिरसोडी – (3-9-18), बिजवडी – (3-13-33), झगडेवाडी – (3-4-9), डाळज नं. 2 -(2-7-14), डाळज नं.3 – (2-7-14), डाळज नं. 1- (3-7-20), – न्हावी – (3-11-27), थोरातवाडी- (2-6-12), कळशी -(2-9-18), रणमोडवाडी (3-9-18) जांब- (2-7-14), मानकरवाडी – (2-7-14), कुरवली – (2-7-14), म्हसोबाचीवाडी- (3-1-2), मदनवाडी – (5-11-26), लाखेवाडी – (2-13-27), बोरी- (3-13-29), रेडणी – (4-11-28), बेलवाडी-(2-13-28), डिकसळ-(3-8-17), गंगावळण -(2-7-14),