पुणे : रेल्वे टीसींच्या टॅबला नेटवर्क मिळेना | पुढारी

पुणे : रेल्वे टीसींच्या टॅबला नेटवर्क मिळेना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांचे काम वेगाने व्हावे, याकरिता रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पुणे विभागातील तिकीट निरीक्षकांना तब्बल 96 टॅबचे वाटप केले होते. याच टॅबला आता सातत्याने नेटवर्कचा अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाइकिरीत्या कामकाजाला आता रेल्वेचे तिकीट निरीक्षक वैतागले आहेत. देशभरातील रेल्वेच्या सर्वच टीसींना (तिकीट निरीक्षकांना) रेल्वे प्रशासनाने आता टॅबचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या पुणे विभागाला मुख्यालयाडून 96 टॅब देण्यात आले होते. तर आणखी 62 टॅबची रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाकडे मागणी केली होती. या टॅबद्वारे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, टीसींचेही काम काही प्रमाणात सुलभ होणार आहे. परंतु, या टॅबला आता नेटवर्कची समस्या येत आहे.

त्यामुळे अनेक कामे करताना विलंब होत आहे. घाट रस्ता, जंगल रस्ता आणि दुर्गम भागातून रेल्वे गाडी जात असताना तिकीट निरीक्षकांना नेटवर्कची समस्या येत आहे. परंतु, आम्ही कोणतेही काम थांबू दिलेले नाही. टीसींसोबत मॅन्युअली चार्ट आणि दंड पावती पुस्तक दिलेले आहे. त्यामुळे कोणतीही कामे थांबत नाहीत, असे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

Back to top button