पुणे : विद्यार्थ्यांसाठी पीएमपी बसच्या विशेष फेर्‍या

पुणे : विद्यार्थ्यांसाठी पीएमपी बसच्या विशेष फेर्‍या

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गर्दीच्या वेळी 8 मार्गांवर सार्वजनिक सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार 'विशेष विद्यार्थी फेर्‍या' सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

या मार्गांवर विद्यार्थी विशेष सेवा…
अनुक्रमे विद्यार्थी विशेष बसचे मार्ग (कंसात वेळ) : 1) वसंत टॉकिज ते धायरी मारुती मंदिर ( सायंकाळी 5.40); 2) डेक्कन कॉर्नर ते एनडीए 10 नंबर गेट (सायंकाळी 5.40); 3) डेक्कन कॉर्नर ते कोथरूड डेपो (सायंकाळी 5.45); 4) डेक्कन ते धनकवडी (टिळक रोड): ( सायंकाळी 5.4); 5) वसंत टॉकिज ते कात्रज (स्वारगेट मार्गे) (सायंकाळी 5.45); 6) वसंत टॉकिज ते कात्रज (स्वारगेट मार्गे) (सायंकाळी 5.45); 7) पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द: (सायंकाळी 5.45); 8) चापेकर चौक (चिंचवड) ते वाल्हेकरवाडी (सायंकाळी 5.50)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news