पिंपरी : कारचालकाला बेदम मारहाण | पुढारी

पिंपरी : कारचालकाला बेदम मारहाण

पिंपरी : कारचालकाला टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी ताथवडे येथील सर्व्हिस रोडवर घडली.
विष्णू यशवंत पाटील (45, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सहा ते सात अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. त्या वेळी सातजण तिथे आले. गाडीला धक्का का मारतो, असा उलट प्रश्न करत आरोपींनी पाटील यांना मारहाण केली.

Back to top button