पुणे : गांजा तस्करी; नगरच्या दोघांना पकडले | पुढारी

पुणे : गांजा तस्करी; नगरच्या दोघांना पकडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गांजा विक्रीसाठी अहमदनगरहून पुण्यात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हडपसर परिसरात पकडले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दोघांकडून 21 किलो गांजा, एक चारचाकी गाडी व मोबाईल असा 10 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अक्षय भिमा गाडे (वय 25) व 27 वर्षीय महिला (रा. दोघेही अहमदनगर) अशी दोघांची नावे आहेत. यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पांढर्‍या रंगाच्या गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, कर्मचारी प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, चेतन गायकवाड, संतोष देशपांडे यांच्या पथकाने सापळ रचून दोघांना पकडले.

Back to top button