सासवड : संत सोपानदेव संजीवन समाधी सोहळा 16 डिसेंबरपासून

सासवड : संत सोपानदेव संजीवन समाधी सोहळा 16 डिसेंबरपासून

सासवड; पुढारी वृत्तसेवा : संत सोपानदेवमहाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार (दि. 16) ते शुक्रवार (दि. 23) या कालावधीत सासवडला रंगणार आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागांतून दिंड्यांचे आगमन होणार आहे. मंदिर आणि परिसरात भजन, कीर्तन, हरिपाठ, हरिनामाचा जागर राहणार आहे. बुधवारी (दि. 21) सोहळ्याचा मुख्य दिवस आहे, अशी माहिती सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

समाधी सोहळ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे – शुक्रवारी सकाळी 9 ते 11 हभप संभाजीमहाराज बडदे (कोडीत) यांचे कीर्तन, सायंकाळी 5 ते 6 हभप विजयमहाराज भिसे यांचे प्रवचन व हरिपाठ, रात्री 8 ते 10 सोपानदेव देवस्थानतर्फे कीर्तन, हनुमान भजनी मंडळ, सासवड यांचे भजन होणार आहे. शनिवारी सकाळी 9 ते 11 हभप परशुराममहाराज काळे (काळेवाडी) यांचे कीर्तन, सायं. 5 ते 6 हभप सोपानरावमहाराज वाईकर यांचे प्रवचन व हरिपाठ, रात्री 8 ते 10 परकळे दिंडीतर्फे कीर्तन, कुंभारवळण ग्रामस्थांचा जागर होणार आहे.

रविवारी सकाळी 9 ते 11 हभप राजाराम बुवा कामथे, कुंभारवळण यांचे कीर्तन, सायं. 5 ते 6 हभप हरेयनम: संस्थान सोलापूर यांचे प्रवचन व हरिपाठ, रात्री 8 ते 10 हभप बंडामहाराज कराडकर यांचे कीर्तन, हभप अंकुश दीक्षित (मुंबई) यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी पहाटे 4 वाजता पवमान अभिषेक, सकाळी 6 ते 8 हभप सोपानराव वाईकर यांचे कीर्तन, सकाळी 9 ते 11 हभप गेनबा पवार यांचे कीर्तन, सकाळी 11 ते दुपारी 1 हरिपाठ, दुपारी 4 वाजता नगरप्रदक्षिणा, सायंकाळी दिंडी प्रमुखांचा सत्कार, रात्री 9 ते 11 हरिबाबा दिंडीतर्फे कीर्तन, रात्री रांजणी, खामगाव, आंबेड, कोंडगाव ग्रामस्थ तसेच सासवडकर व गणपतबुवा जाधव दिंडीचा जागर होणार आहे.

मंगळवारी सकाळी 9 ते 11 कातोबानाथ दिंडी (दिवे) पंचक्रोशी यांच्या वतीने कीर्तन, दुपारी 12 ते 2 हभप सुनीलमहाराज फरतडे (बोपगाव) यांचे कीर्तन, 3 ते 6 चक्री प्रवचन, नंतर हरिपाठ, रात्री 8 ते 10 हभप बाळासाहेबमहाराज देहूकर यांचे कीर्तन, कुसमाडी (ता. येवला) दिंडीचा जागर होणार आहे.

बुधवारी सकाळी 10 ते 12 हभप केशवमहाराज नामदास, पंढरपूर यांचे समाधी वर्णनाचे कीर्तन, दुपारी 1 वाजता अंजीर सहकार मंडळ, नवी मुंबई यांच्याकडून महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 सत्यवती एदलाबादकर यांचे प्रवचन, सायं. 5 ते 8 महिन्याचे वारकरी यांचे भजन व हरिपाठ, रात्री 8 नंतर महिन्याचे वारकरी श्री संत नामदेवमहाराज यांनी रचलेल्या सोपान महाराज यांच्या समाधी वर्णनाचे अभंग, मंदिर प्रदक्षिणा, हभप बाळकृष्ण बुवा दिंडीचा जागर.

गुरुवारी सकाळी 10 ते 12 भोपाळे दिंडी क्रमांक 14 मरकळकर यांचे माऊली रथापुढे काल्याचे कीर्तन, दहीहंडी व दिंडी प्रदक्षिणा, सायंकाळी 5 ते 6 वाजता सोपानदेव देवस्थानतर्फे प्रवचन, सायंकाळी 6 नंतर महिन्याचे वारकरी यांचे भजन व हरिपाठ, हभप रोकडोबा दादा दिंडीचा जागर.

शुक्रवारी सकाळी 9 ते 11 हभप म्हस्कुजी महाराज कामठे, चांबळी यांचे कीर्तन, सकाळी 11:30 ते 12 प्रक्षाळ पूजा होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 वाजता सोपानदेव देवस्थानतर्फे प्रवचन, नंतर हरिपाठ, रात्री 8 ते 10 सोपानदेव देवस्थानतर्फे काल्याचे कीर्तन व उत्सवाची सांगता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news