पुणे : तृतीयपंथींसाठी उद्या मतदार नोंदणी शिबिर | पुढारी

पुणे : तृतीयपंथींसाठी उद्या मतदार नोंदणी शिबिर

पुणे : तृतीयपंथींसाठी मंगळवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 213 हडपसर मतदारसंघातर्फे हडपसर येथील क्षेत्रीय कार्यालयात होणार्‍या या शिबिराचा लाभ सर्व तृतीय पंथीयांनी घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी मतदार नोंदणी अधिकारी बालाजी सोमवंशी आणि नायब तहसीलदार राजेश कानसकर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button