पिंपरी : फ्रेंचायसीच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक | पुढारी

पिंपरी : फ्रेंचायसीच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  कंपनीची फ्रेंचायसी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक कोटी सात लाख 44 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सप्टेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात हा प्रकार घडला. संतोष सुरेश काकडे (39, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, याकूब अली खाजा अहमद, राघवेंद्र रेड्डी नानायाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांना झायसोल इंटिग्रेटेड सोल्युशन या कंपनीची फ्रेंचायसीचे आमिष दाखवले. फ्रेंचायसीसाठी आरोपींनी काही रक्कम घेतली. त्यानंतर ऑफिसचे भाडे, डीपॉझीट, इकंपनीचे हब विकत घेणे, हबचे इंटेरियर आणि अन्य कारणांसाठी एक कोटी सात लाख रुपये घेतले. दरम्यान, स्टोअर सुरू झाल्यानंतर खूप फायदा होईल, असे आरोपींनी आमिष दाखवले. मात्र, काकडे यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना फोन करून पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपी याकूबने पैसे घेण्यासाठी हैद्राबाद येथे आलास तर मारून टाकीन अशी धमकी दिली.

Back to top button