कात्रज चौकात अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | पुढारी

कात्रज चौकात अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज चौकात सिमेंट मिक्सर ट्रकची दुचाकीस धडक बसली. या अपघात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ज्ञानदेव गणपतराव डोके (रा. माऊलीनगर कात्रज-कोंढवा रोड), असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे नाव आहे. डोके हे दुचाकीवरून कात्रज चौकातून जात असताना दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्यांना सिमेंट मिक्सर ट्रकची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना भारती विद्यापीठ हॉस्पिटल दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.

वाहतूक समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कात्रज चौकातील अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हातगाडी व पथारी व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. उड्डाणपुलाचे काम देखील आहे. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अपघातही होत आहे. यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

Back to top button