

खोर : पुढारी वृत्तसेवा : वरवंड (ता.दौंड) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास जनार्धन दिवेकर (वय ७४ यांचे गुरुवारी निधन झाले आहे. रामदास दिवेकर यांनी पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक पद भूषविले आहे. वरवंड गावाच्या विकासाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान होते. वरवंड ग्रामपंचायतचे सन १९९१ ला प्रथम सरपंच, त्यानंतर अनेकदा सरपंच पद व सलग २५ वर्ष ग्रामपंचायत सदस्य, सन १९८३ ला बाजार समितीचे संचालक, सन १९८५ व २००२ मध्ये भीमा पाटस साखर कारखान्याचे संचालक, श्री नागनाथ महाराज विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष असे अनेक पदे भूषविले आहेत.
पुणे जिल्हा दुध संघाचे विद्यमान उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांचे ते वडील असून वरवंड माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्या मिनाताई दिवेकर यांचे ते पती आहेत. त्यांच्या पाठीमागे दोन पत्नी, सहा मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. रामदास दिवेकर यांच्या निधनाने वरवंड गावावर शोककळा पसरली असून शुक्रवारी वरवंड येथील कडेठाण रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने दौंड तालुक्यातील राजकीय, समाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वरवंड गावातील बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती.