राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा; काळे झेंडे दाखवत स्वराज्य संघटनेकडून निषेध | पुढारी

राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा; काळे झेंडे दाखवत स्वराज्य संघटनेकडून निषेध

पुणे : पुण्यात स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस छावणी चे स्वरुप दिल्याने आंदोलन कर्त्यांकडून काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न करत त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आंदोलनकर्त्यांना त्यांच्या ताफ्याच्या दिशेने जाण्यास अटकाव करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना काळे झेंडे दाखवत, ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर राज्यभरातून याचे पडसाद उमटत आहे. दरम्यान खा. उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी देखील यांच्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करत, त्यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज्यभरात विरोधी पक्ष आणि विविध संघटनाच्या वतीने राज्यपाल विरोधात आंदोलन करण्यात आले आहेत.

युवक काँग्रेसकडूनही निषेध
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही पुण्यात राजभवनासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्यपाल मुडदाबादच्या घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Back to top button