इंदापुरात सरपंचपदाकरिता 70 अर्ज | पुढारी

इंदापुरात सरपंचपदाकरिता 70 अर्ज

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता गुरुवारी (दि. 1) अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत 26 ग्रामपंचायतींपैकी 25 ग्रामपंचायतींमधून सरपंचपदाकरिता 70 अर्ज तर 26 ग्रामपंचायतींमधून सदस्यपदाकरिता 388 अर्ज दाखल झाले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.

सदस्यपदासाठी माळवाडी 15, पिंपरी खुर्द-शिरसोडी 13, बिजवडी 14, डाळज नं. 2 येथे 18, डाळज नं. 3 येथे 17, डाळज नं. 1 येथे 19, न्हावी 14, कळाशी 20, मदनवाडी 24, लाखेवाडी 31, बोरी 15, रेडणी 25, बेलवाडी 6, पडस्थळ 9, हिंगणगाव 7, अजोती सुगाव 8, झगडेवाडी 16, थोरातवाडी 26, रणमोडवाडी 8, जांब 6, मानकरवाडी 9, कुरवली 16, म्हसोबावाडी 9, बेलवाडी 6, डिकसळ येथे 21, गंगावळण 8 आणि सराटी येथे 14 असे 388 अर्ज दाखल झाले आहेत.

सरपंचपदासाठी हिंगणगावमधून 3, अजोती सुगाव 3, माळवाडी 5, पिंपरी शिरसोडी 2, बिजवडी 2, झगडेवाडी 7, डाळज नं. 2 मधून 3, डाळज नं. 3 मधून 3, डाळज नं. 1 मधून 8, न्हावी 1, थोरातवाडी 4, कळाशी 3, रणमोडवाडी 2, जांब 1, कुरवली 3, म्हसोबावाडी येथून 1, मदनवाडी 5, लाखेवाडी 2, बोरी 3, रेडणी 5, बेलवाडी 1, डिकसळ 3, सराटी 1, पडस्थळ येथून 3 तर गंगावळण येथून 1 असे एकूण 70 अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. 2) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Back to top button