गाडीतून पडलेल्या खडीमुळे वाहनांचे नुकसान; भवानीनगर येथील प्रकार | पुढारी

गाडीतून पडलेल्या खडीमुळे वाहनांचे नुकसान; भवानीनगर येथील प्रकार

चाकण; पुढारी वृत्तसेवा : कायद्याने बालविवाह लावणे आणि करून देणे हा गुन्हा असतानादेखील बालविवाहांच्या धक्कादायक घटना समोर येत आहे. असाच एक प्रकार 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने खेड तालुक्यात उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मे ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडला. धक्कादायक म्हणजे यातील गुन्हा दाखल झालेल्या पतीचादेखील मृत्यू झाला आहे.

याबाबत करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा वडगाव मावळ येथील रहिवासी असलेल्या पतीविरुद्ध बालविवाह कायदा, पॉक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पतीचा 16 नोव्हेंबर रोजी अपघातात मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. बुधवारी 12 वर्षांची मुलगी फिर्यादी यांच्याकडे पोटात दुखत असल्याने उपचारासाठी आली होती. फिर्यादी यांनी तिला तपासले असता, ती गरोदर असल्याचे समजले. फिर्यादी यांनी चाकण पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता, तिने तिचे पती चालक म्हणून काम करीत होते. 16 नोव्हेंबर रोजी भंडारा डोंगर येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी आणि पीडित मुलगी यांची ओळख गावच्या जत्रेत झाली होती. आरोपीने लग्नाची मागणी करून लग्नास नकार दिला, तर औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी मुलीला दिली. पीडित मुलीने लग्नाला होकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न केले. तपास चाकण पोलिस करीत आहेत.

Back to top button