आदिवासींना शासकीय दाखले; खानापूर येथील मेळाव्यास प्रतिसाद | पुढारी

आदिवासींना शासकीय दाखले; खानापूर येथील मेळाव्यास प्रतिसाद

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव व हवेली प्रांत विभागाच्या वतीने खानापूर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या मेळाव्यात सिंहगड-पश्चिम हवेलीतील वंचित आदिवासी कातकरी बांधवांना जागेवरच रेशन कार्ड, आधारकार्ड यांसह विविध दाखले व शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. सिंहगड, पानशेत, खानापूर, खडकवासला भागातील एक हजारांहून अधिक कातकरी बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्यात 180 जणांना जातीचे दाखले, 105 जणांना आधार कार्ड आणि 61 जणांना रेशन कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. तसेच, 45 महिला, बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

केंद्र शासनाच्या भटक्या व विमुक्त जाती विकास व कल्याण विभागाचे सदस्य कृष्णचंद्र सिसोदिया, आमदार भीमराव तापकीर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, शरद जावळकर, नंदू जावळकर, दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पारगे, तानाजी थोपटे आदी उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाच्या रेणुका जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button