पुणे : कोरोना काळात कमी नोंदी; यंदा मात्र जास्त एचआयव्ही रुग्ण | पुढारी

पुणे : कोरोना काळात कमी नोंदी; यंदा मात्र जास्त एचआयव्ही रुग्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एड्स निर्मूलनासाठी जनजागृती, तपासणी असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, कोरोना काळात कमी रुग्णांची नोंद झाल्याने यंदा शहरातील एचआयव्हीबाधितांचा आकडा चढा असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात 2020 मध्ये 1035, तर 2021 मध्ये 1121 बाधित आढळून आले. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या दहा महिन्यांच्या कालावधीत 1 हजार 136 एचआयव्ही बाधितांची नोंद झाली आहे.

पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेतर्फे एचआयव्हीबद्दल जनजागृती, रक्तचाचणी आणि समुपदेशन अशा तीन पातळ्यांवर काम केले जाते. गेल्या सात वर्षांमध्ये 2016 मध्ये सर्वाधिक 1 हजार 828 एड्सबाधित शहरात आढळून आले होते. त्यानंतर 2017 मध्ये 1431, 2018 मध्ये 1706, 2019 मध्ये 1768 बाधितांची नोंद झाली. कोरोना काळात बाधितांच्या नोंदीत घट झाली. त्यामुळे 2020 मध्ये 1035, तर 2021 मध्ये 1121 बाधित आढळून आले. 2022 मध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

इतर आजारांच्या विशेषतः क्षयरोग, एचआयव्ही आदी आजारांच्या रुग्णांच्या नोंदीवर परिणाम झाला. त्यामुळे कोरोनाकाळात कमी एचआयव्हीबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन वर्षांमधील आकडेवारीवरून, पुरुषांमधील एड्सचे प्रमाण वाढत असून, महिलांमधील प्रमाण कमी होत आहे.

020 मध्ये 517, 2021 मध्ये 582 आणि 2022 मध्ये 617 पुरुष एचआयव्हीबाधित असल्याचे आढळून आले. महिलांमध्ये हे प्रमाण 2020 मध्ये 384, 2021 मध्ये 441 आणि 2022 मध्ये 410 असे आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये 4 मुले, 5 मुली आणि 13 तृतीयपंथींमध्ये, तर 48 गर्भवतींमध्ये एचआयव्हीचे निदान झाले आहे.

Back to top button