पुणे : पोलिसांविरोधात अश्लील भाषेत कंमेट करणार्‍या नऊ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : पोलिसांविरोधात अश्लील भाषेत कंमेट करणार्‍या नऊ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस वाहतुक नियमन करताना पोलिसांच्या क्रेन व्हॅनने वाहतुकीचे नियम डावलल्याने गाडी उचलली. त्यावर त्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करून पोलिसांच्या कामवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्याच्या या व्हिडीओला अत्यंत हीन पातळीच्या शिवीगाळ कम अश्लिल दर्जाच्या लेखी कंमेट करण्यात आल्या. व्हिडीओ करणार्‍या आणि अशा कंमेंट करणार्‍या 9 जणांवर आता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय सागर (रा. अहिरिश गार्डन, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे), प्रशांत पाटील, परिक्षीत याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतिष काळे, दत्तात्रय पटेरे, गणेश मोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे. विजय सागर वरिष्ठ ग्राहक सल्लागार आहेत.

एकीकडे शहरात वाहतुक कोंडीचा प्रश्न पुणेकरांना भेडसावत असताना वाहतुक नियमन करणार्‍या तसेच आपले कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना टिकेला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार या गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस अरविंद माने यांनी सांगितलं की दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाहतुक नियम मोडल्यानंतर नंतर पोलिसांच्या क्रेन गाडीने विजय सागर यांची दुचाकी उचलली. त्यावर सागर यांनी त्याच्या मोबाईलमध्ये संबंधीत घटनेचे फेसबुक लाईव्ह केले.

त्यांच्या या फेबसुक लाईव्हला इतर आठ जणांनी महिला पोलिसाविरोधात अश्लील भाषेत कंमेंट लिहल्या. अत्यंत अश्लील भाषेत आणि
हीन दर्जाच्या कमेंट पाहिल्यानंतर संबंधीत पोलिस कर्मचारी महिलेनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्तव्य बजावणार्‍या पोलिस महिलेला अशा पध्दतीने टिकेचे धनी व्हावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक विक्रम गौड करत आहेत.

Back to top button