पुणे : कंत्राटीचे वेतन थकले , महापालिकेकडे कामगारांची 20 कोटींची थकबाकी | पुढारी

पुणे : कंत्राटीचे वेतन थकले , महापालिकेकडे कामगारांची 20 कोटींची थकबाकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे विविध विभाग व आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे मागील सात महिन्यांत 20 कोटी 12 लाख 3 हजार 902 वेतन थकले आहे. हे वेतन थकवून कर्मचार्‍यांची पिळवणूक करणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेमधील विविध विभाग आणि खात्यांमध्ये ठेकेदार पध्दतीने कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाते. यामध्ये विविध क्षेत्रीय कार्यालयांमधील आरोग्य, साफसफाई, आस्थापना, सुरक्षा, मोटार वाहन, माहिती तंत्रज्ञान, पथ अशा अनेक विभागांमधील 6 हजार 500 कंत्राटी कर्मचार्‍यांचे एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीतील 20 कोटी 12 लाख 3 हजार 902 वेतन थकले आहे. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (ईपीई) तसेच कर्मचारी विमा योजना (ईएसआयसी) रकमेचाही समावेश आहे.

नगर रोड, ढोले पाटील रोड, घोले रोड, औंध, कोथरूड, वारजे, सिंहगड, धनकवडी, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी, विश्रामबागवाडा आदी क्षेत्रीय कार्यालयांसह आरोग्य विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्युत विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन थकले आहे. यामध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील कर्मचार्‍यांचे सर्वाधिक वेतन थकले आहे.  येरवडा, वानवडी क्षेत्रीय कार्यालय, पथ, मोटार वाहन विभाग, मंडई आणि सांस्कृतिक विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन
थकलेले नाही.

Back to top button