पिंपरी : पालिका हद्दीत उभारणार जिजाऊ क्लिनिक ; 65 कोटी खर्चाच्या विकासकामांना मान्यता | पुढारी

पिंपरी : पालिका हद्दीत उभारणार जिजाऊ क्लिनिक ; 65 कोटी खर्चाच्या विकासकामांना मान्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली. बैठकीत सुमारे 65 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यपद्धतीनुसार आयुक्तांकडूनही थेट, मुदतवाढ व अवास्तव खर्चाच्या कामांना हिरवा कंदील जात आहे.  पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात मंगळवारी (दि.29) बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. पालिका हद्दीत ठिकठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहे.

त्यासाठी 1 कोटी 57 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका हद्दीबाहेरील खडकी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील चाणक्य कार्यालयाच्या वरील दुसर्‍या मजल्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. नवीन शवागृह इमारत बांधण्याच्या कामातील उर्वरित स्थापत्यविषयक अनुषंगिक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपये सुधारित खर्च मंजूर करण्यात आला. भाटनगर येथील पालिकेच्या जुन्या मैला शुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या 31 कोटी रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या प्रस्तावांना आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली.

Back to top button