पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून पीएमपीची बस सेवा पुन्हा सुरू | पुढारी

पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून पीएमपीची बस सेवा पुन्हा सुरू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कोरोना काळापूर्वी सुरू असलेली पीएमपीची बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या आता रेल्वे स्थानकातील लेन नंबर 4 मधून धावतील आणि रेल्वे प्रवाशांना सेवा पुरवतील.

पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरुवातीला ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. त्यावेळी या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गुंडे यांनी ही सेवा कायमस्वरूपी सुरू केली. मात्र, कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आली होती. आता पीएमपीचे नवे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही बससेवा 1 डिसेंबर 2022 पासून रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

या आठ मार्गांवरून येणार पुणे स्थानकात बस…

1) पुणे स्टेशन ते वडगांव/वेणूताई

2) पुणे स्टेशन ते एनडीए सेट नं. १०

3) पुणे स्टेशन से अप्पर डेपो

4) पुणे स्टेशन ते हिंजवडी

5) म.न.पा. भवन ते डी. वाय. पाटील कॉलेज

6) पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज

7) पुणे स्टेशन ते चिंचवडगांव

8) म.न.पा. भवन ते डायमंड वॉटर पार्क दादांची पडळ

Back to top button