तळेगाव: महामार्गाच्या कडेचे लोखंडी रेलिंग काढल्यामुळे अपघातास आमंत्रण | पुढारी

तळेगाव: महामार्गाच्या कडेचे लोखंडी रेलिंग काढल्यामुळे अपघातास आमंत्रण

तळेगाव स्टेशन: उर्से टोल नाक्यापासुन वडगाव फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेचे लोखंडी रेलिंग -कठडे काही व्यावसायिकांनी काढले आहेत. हा महामार्ग असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. उतारामुळे आणि एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास भयानक अपघात होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता आहे. तसेच सभोवतालच्या व्यावसायिकांसाठी देखील धोकादायक आहे.

याबाबत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. लोखंडी रेलिंग कोण काढते, याबाबत सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात यावेत. रात्री या रस्त्यावर अनेक ठिकाणी दिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. तरी ज्या ठिकाणचे लोखंडी रेलिंग काढले आहेत, तिथे परत बसविण्यात यावेत आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत या बाबत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी वाहन चालकांची आणि नागरिकांची मागणी आहे.

Back to top button