बाणेर : 11 वर्षांनी पुलाला मिळाली ओळख

बाणेर : 11 वर्षांनी पुलाला मिळाली ओळख

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : सन 2011 मध्ये उद्घाटन झालेल्या बाणेर ते पिंपळे निलखला जोडणार्‍या पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. मात्र, त्याचा नामोल्लेख असणारी ना कोनशिला होती, ना लोखंडी फलक. त्याकडे लक्ष वेधत रिपब्लिकन पक्षाकडून त्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याला प्रतिसाद देत संविधानदिनी पुणे महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख असलेली कोनशिला आणि नामफलक लावण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून या पुलाच्या कोनशिलेचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर यांच्या हस्ते झाले.

2011 साली उद्घाटन झालेल्या या पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील भागात त्यांच्या हद्दीमध्ये या पुलाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या नावाचा नामफलक लावला होता. परंतु, पुणे महानगरपालिकेच्या बाजूला असा कोणताही नामफलक लावण्यात आला नव्हता. तो लावावा यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रमेश ठोसर यांनी पाठपुरावा सुरू होता. त्याला प्रतिसाद देत पुणे महानगरपालिकेने ही कोनशिला लावली. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन साठे, कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, रिपाइंचे महेंद्र कांबळे, राहुल बालवडकर, प्रकाश बालवडकर, संजय कांबळे, सचिन मानवतकर, तुकाराम गाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news