पुणे : घाना देशातून आणले सागवानी लाकूड ; दुरुस्तीनंतर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला गतवैभव | पुढारी

पुणे : घाना देशातून आणले सागवानी लाकूड ; दुरुस्तीनंतर मिळेल छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला गतवैभव

समीर सय्यद  :

पुणे : लष्कर भागातील ऐतिहासिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला आग लागून सुमारे 25 दुकाने जळून खाक झाली होती, तेव्हापासून व्यापारी उघड्यावर व्यवसाय करीत आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने निधी उपलब्ध करून दिला असून, आता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या मार्केटला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असून, त्यासाठी घाना देशातून सागवान लाकूड आयात करण्यात आले आहे.  मार्केटच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी उपलब्ध करून दिला.

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधी नाही, त्यामुळे व्यापार्‍यांनी थकलेल्या भाड्यापोटी सुमारे 25 लाख रुपये जमा केले. तसेच स्थानिक आमदार सुनील कांबळे यांनी 25 लाख रुपये दिले. त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने पन्नास लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्लूडी) दिला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. लष्कर भागातील ऐतिहासिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला आग लागून सुमारे 25 दुकाने जळून खाक झाली होती, तेव्हापासून व्यापारी उघड्यावर व्यवसाय करीत आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने निधी उपलब्ध करून दिला असून, आता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या मार्केटला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असून, त्यासाठी घाना देशातून सागवान लाकूड आयात करण्यात आले आहे.

सागवानी लाकूडच का?

सागवान लाकडाचा शोध सुरू झाला, परंतु ते मिळत नसल्यामुळे अनेक दिवस काम बंद होते. भिवंडी येथे लाकडाच्या वखारी आहेत. त्याठिकाणी विदेशातील लाकूड आयात केले जाते. तेथे घाना येथून आयात केलेले सागवान लाकूड आणण्यात आले. सागवान लाकडाचे टिकाऊपणा, आकार-स्थिरता आणि इतर रासायनिक व भौतिक गुणधर्मांमुळे सागवानी लाकडाचे महत्त्व आहे. जगातील उत्कृष्ट लाकडांपैकी ते एक असल्याचे मानले जाते. त्याचे रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) पांढरट-पिवळे ते तपकिरी आहे. वाळवी, इतर कीटकांपासून सहसा त्याला इजा पोहोचत नाही. तसेच पाण्याचाही परिणाम त्यावर जाणवत नाही.

मार्केटला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार लाकडाचा शोध घेण्यात आला, परंतु पुणे आणि परिसरात कुठेही आवश्यक लाकूड मिळाले नाही. त्यानंतर भिवंडी येथील वखारीतून सागवान लाकूड आणले आहे. ते घाना देशातून आयात केले आहे.
                                                                  – प्रमोद माने, कंत्राटदार.

Back to top button