चक्क पुण्यात तापमानाची हनुमान उडी ! | पुढारी

चक्क पुण्यात तापमानाची हनुमान उडी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समशीतोष्ण हवामानासाठी प्रसिध्द असलेल्या पुणे शहरात यंदा चक्क हिवाळ्यात उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. 21 नोव्हेंबर रोजी शहराचे किमान तापमान 8.8 अंशांवर खाली आले होते. मात्र, हवामानातील आमूलाग्र बदलाने ते 26 रोजी चक्क 19.1 अंशांवर गेल्याने शनिवार व रविवार पुणेकरांना उकाडा सहन करावा लागला.

शहरातील किमान तापमानात अचानक दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याने हिवाळ्यात चक्क उन्हाळा जाणवत आहे. शनिवार व रविवारी शहरात थंडीऐवजी चक्क उकाडा जाणवत होता. शहरात डिसेंबरमध्ये जास्त थंडी पडते, मात्र नोव्हेंबरमध्ये शहरात नीच्चांकी तापमानाचे अनेक रेकॉर्ड झाले आहेत. 27 नोव्हेंबर 1964 रोजी शहराचा किमान तापमानाचा पारा 4.6 अंशांवर खाली आला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये इतके तापमान पुढे मात्र खाली गेले नाही. मात्र त्यांनतर ते 7 ते 9 अंशांवर खाली आल्याचे दाखले आहेत. तापमानात फरक 2 ते 5 अंश हा मोठा समजला जातो, त्यामुळे गेल्या सहा दिवसांतील 10.3 अंश सेल्सिअस हा किमान तापमानातील फरक खूप मोठा आहे, त्यामुळे शहरात उकाडा जाणवत आहे.

Back to top button